नगरसेवक सय्यद मतीन मारहाणप्रकरणी औरंगाबादच्या उपमहापौरांसह ५ नगरसेवकांना अटक

503

औरंगाबाद, दि. २० (पीसीबी) – भारताचे माजी पंतप्रधान अटलबि‍हारी वाजपेयी यांच्‍या शोक प्रस्‍तावाला विरोध केल्‍याबद्द्ल एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या सभागृहात बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी उपमहापौरांसह भाजपच्‍या ५ नगरसेवकांना अटक करण्‍यात आली आहे.

उपमहापौर विजय औताडे, राजगौरव वानखेडे, प्रमोद राठोड, रामेहवर भादवे, माधुरी अदवत यांना अटक करण्‍यात आली आहे.

औरंगाबाद महापालिका सभागृहात वाजपेयींना १७ ऑगस्टरोजी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावास एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला होता. त्‍यानंतर संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी मतीन याला चांगलाच चोप दिला होता. या अमानुष मारहाणीत मतीन जखमी झाला होता. यात भाजपचे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे आघाडीवर होते.