नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे-पाटील

154

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे  मी नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे  नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (गुरूवार) येथे पत्रकार परिषदेत  स्पष्ट केले.  

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विखे बोलत होते.

सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार, अशी चर्चा सुरू झाली होती.  मात्र,  सुजय विखे यांचा भाजप प्रवेश, शरद पवार यांच्याबद्दल नाराजी याबद्दल विखे यांनी भाष्य केले.

विखे म्हणाले की, औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेबाबत समन्वय साधण्याचा प्रयत्न  केला होता. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी नगरच्या जागेची मागणी केली होती. राष्ट्रवादीनेही काही जागा बदलून मागितल्या होत्या नगर लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता. तसेच येथे काँग्रेसला विजयी होण्याची शक्यता  होती, त्यामुळेच नगरची मागणी आम्ही करत होतो, असे ते म्हणाले.