‘नकोशी’ला इंद्रायणी नदीच्या घाटावर सोडून जन्मदाते पसार

559

आळंदी,दि.१८ (पीसीबी) – आळंदीतील इंद्रायणी नदीच्या घाटावर नवजात अर्भक सोडून जन्मदाते पसार झाल्याची मनाला सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. हे अर्भक स्त्री जातीच असल्याने माऊलीच्या दारात या चिमुकलीवर नकोशी होण्याची वेळ आली त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शेकडो भाविक आळंदीमध्ये दाखल झाल्याने नेमकं हे कृत्य कुणी केलं असेल याचा आळंदी पोलीस शोध घेत आहेत.

मुलीविषयी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चिमुकलीची प्रकृती स्थिर आहे. तिला जवळच्या शिशुविहारात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान एक महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

WhatsAppShare