नंदूरबारमध्ये संतप्त जमावाकडून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना मारहाण

480

नंदूरबार, दि. २७ (पीसीबी) – आश्रमशाळेतील पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्यामुळे संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना मारहाण केल्याची घटना नंदूरबारमध्ये   घडली. दोन्ही अधिकाऱ्यांवर सरकारी रूग्णालयात उपचार  सुरू आहेत.  

विनय गौडा असे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचे नाव आहे. नंदूरबारमध्ये सनदी अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची एकाच महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. तरीही अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील आश्रमशाळेत सचिन चंद्रसिंग मोरे हा पाचवीत शिकत होता. विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर अचानक हल्ला केला.