ध्येय निश्चित करून शैक्षणिक वाटचाल करावी – सीए गार्डी

194

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – मोबाईल हि गरजेबरोबरच एक व्यसन बनले आहे. मुले तासनतास मोबाईल खेळत असल्याचे दिसत आहे. स्पर्धेच्या युगात मुलांनी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ सोशल मीडियावर न घालवता अभ्यासामध्ये घालावा. आपले ध्येय निश्चित करून शैक्षणिक वाटचाल करावी. असा सल्ला दि इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया पिंपरी-चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी यांनी दिला.

संत शिरोमणी श्री सावता महाराज प्रतिष्ठानच्या वतीने सावता महाराज पुण्यतीथी निमित्ताने काळेवाडी येथे समाजभूषण पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्याबद्दल अरुण भूमकर व मंगेश हिंगणे यांना समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ दत्तात्रय बाळसराफ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर राहुल जाधव, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभुवन, सुरेश नढे सुरेश तापकीर, विनोद तपकीर निता पाडाळे, सविता खुळे, उषा काळे, वसंत लोंढे,

हभप तुकाराम महाराज हापसे, मधुकर महाराज मोरे, मनोहर सुभेकर, अरुण बकाल, बाळासाहेब वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काळेवाडी परिसरातून संत शिरोमणी सावता माळी यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच कीर्तन, भजन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी हभप दिगंबर महाराज पोकळे यांनी आपल्या किर्तनातून समाज प्रबोधन तर सीए गार्डी यांनी मुलांना करियर विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हनुमंत नेवसेकर तर सूत्रसंचालन अध्यक्ष सुखदेव खेडकर यांनी केले तर आभार सुरेश बनकर यांनी मानले.