धावडेवस्तीत धारदार शस्त्राने वार करत विधवा महिलेचा खून

132

भोसरी, दि. 26 (पीसीबी) – महिलेच्या घरात घुसून धारधार शस्त्राने वार करत तिचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 25) रात्री सव्वा नऊच्या सुमारास धावडेवस्ती, भोसरी येथे उघडकीस आली. कलावती धोंडीबा सुरवार (वय 38, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कलावती यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2021 पासून त्या मुलासह धावडेवस्ती येथे राहत होत्या. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात इसमाने घरात घुसून धारदार शस्त्राने वार करीत त्यांचा खून केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

WhatsAppShare