धार्मिक प्रचाराच्या नावाखाली शोषण करणाऱ्या `त्या` बाबाला हजार वर्षांची शिक्षा

0

अंकारा, तुर्कस्तान दि. १२ (पीसीबी) : धार्मिक प्रचाराच्या नावाखाली लैंगीक शोषण, फसवणूक आणि गुन्हेगारी टोळी निर्माण करणाऱ्या एका इस्लामी टीव्ही प्रचारक आणि लेखकाला तब्बल 1075 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. हा धर्मप्रचारक मूळचा तुर्कस्तान देशातील आहे. तुर्कस्तान येथील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याविरोधात लैंगिक शोषण, फसवणूक तसेच इतरही अनेक गुन्हे नोंदवण्यात आले असून अदनान ओक्तार असे त्याचे नाव आहे. दरम्यान, अशा प्रकारची शिक्षा ऐकताच अन्य धर्मप्रचारकांचे धाबे दणानले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ओक्तार याचे यापूर्वी स्व:तचे एक टीव्ही चॅनेल होते. या चॅनलवर तो इस्लामिक विषयांवर वेगवेगळे टॉक शो होस्ट करायचा. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मोक्तारने एकदा अर्धनग्न मुलींसोबत डान्स केला होता. त्या डान्सचेसुद्धा त्याने आपल्या चॅनेलवर प्रसारण केले होते.

इस्तानबूल पोलिसांनी ओक्तारला 2018 च्या जुलैमध्ये अटक केली होती. यावेळी पोलिसांनी ओक्तारसोबत अन्य 77 जणांनासुद्धा ताब्यात घेतलं होतं. त्यांनतरच्या चौकशीमध्ये ओक्तारने मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाले आहेत. तो या मुलींना ‘किटन’ म्हणून संबोधित असे. तर मुलांना तो ‘लॉयन’ म्हणायचा. असं म्हटलं जातं की, तो या मुलींचे ब्रेन वॉश करायचा.

तुर्कस्तानचे शासकीय माध्यम अनादोलूने दिलेल्या माहितीनुसार ओक्तार आणि त्याच्यासोबतच्या 13 अट्टल गुन्हेगारांना एकूण 9803 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एकट्या ओक्तारला 10 आरोपांखाली तब्बल 1075 वर्षे आणि 3 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

WhatsAppShare