धारावीत चक्कर येऊन पडल्याने गोविंदाचा मृत्यू

117

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – धारावीत दहिहंडी उत्सवात मनोरा रचताना चक्कर आल्याने पहिल्या थरावरून पडल्याने २७ वर्षीय अंकुश खंदारे या गोविंदा मृत्यू आज (सोमवार) झाला. धारावी बाळ गोपाळ पथकाचा हा गोविंदा होता. सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, दहिहंडीसाठी मानवी मनोरे रचताना आतापर्यंत ६० गोविंदा जखमी झाले आहेत.  यांपैकी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यात धारावीतील २७ वर्षाच्या अंकुश खंदारे या गोंविदाचा मृत्यू झाला आहे.  पहिल्या थरावर असताना चक्क्र आल्याने तो थरावरून खाली पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता लगेच मृत घोषित करण्यात आले.