धायरीत उकळते दूध अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

235

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – उकळते दूध अंगावर पडल्याने एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२७) धायरी परिसरात घडली.

भार्गवी अक्षय कुलकर्णी (वय १ वर्ष, रा. रायकर मळा, धायरी) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भार्गवी घरामध्ये खेळत असताना तिच्या अंगावर उकळते दूध पडले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज (मंगळवार) सकाळी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. भार्गवीच्या मृत्यूमुळे धायरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.