धन्यवाद पिंपरी-चिंचवडकरांनो! “पीसीबी टुडे” फेसबुक पेजचे ५ लाख फॉलोअर्स; उद्योनगरीच्या सोशल मीडियात “पीसीबी”चीच धूम!

84

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडसह राज्य-देश-विदेशात विविध क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या, चर्चेतल्या विषयांवरची विश्लेषणे, आकर्षक फोटो आणि व्हिडीओ वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या “पिंपरी-चिंचवड बुलेटिन” अर्थात “पीसीबी टुडे”च्या फेसबुक पेजने सोमवारी (१० ऑगस्ट २०१८) पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पाच लाखांहून अधिक वाचक “पीसीबी टुडे”च्या फेसबुक पेजला फॉलो करत आहेत. तसचे २ लाख ८७ हजारहून अधिक वाचकांनी “पीसीबी टुडे” च्या फेसबुक पेजला लाइक केले आहे. वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळेच अवघ्या पाच वर्षांच्या आत “पीसीबी”ला एवढी मोठी मजल मारता आली आहे. कमी वेळेत अडीच लाखांहून अधिक लाइक्सचा टप्पा ओलांडणारे “पीसीबी टुडे”हे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मराठी बातम्यांचे एकमेव संकेतस्थळ आहे. केवळ वाचकांच्या पसंतीच्या जोरावर पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या सोशल मीडियात “पीसीबी”चीच धूम आहे.