धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या

217

सेलू, दि. १२ (पीसीबी) – मराठा आरक्षाना नंतर आता धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास गोमेवाडी तालुका सेलू येथून उघडकीस आली.

योगेश राधाकिशन कारके (वय २०, रा.गोमेवाकडी ता.सेलू ) असे रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास  मयत योगेश याने त्याच्या मोबाईलवरुन मी धनगर समाजासाठी जीव देत आहे, असा टेक्ट मेसेज लिहित तो बी. शिंदे यांच्या नंबरवर पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेटवर्कच्या कारणामुळे तो संदेश पुढे पोहचू शकला नाही. यादरम्यान त्याने घराच्या छताला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत योगेश याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितिन काशीकर तपास  करत आहेत.