धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करणार – मुख्यमंत्री

56

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) संस्थेने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल या महिन्याअखेर  राज्य सरकारला प्राप्त होईल. त्यानंतर वैधानिक कार्यवाही पूर्ण करून केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.