धनगर आरक्षणावर वेळीच लक्ष द्या, नाहीतर तेही रस्त्यावर उतरतील – विकास महात्मे

10

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – धनगर समाजाच्या आरक्षणावर वेळीच लक्ष न दिल्यास मराठ्यांप्रमाणे धनगरही रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा देत खासदार विकास महात्मे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.  धनगर समाजाच्या प्रलंबित आरक्षणासंदर्भात आज (शुक्रवारी) राज्यसभेत विकास महात्मे यांनी लक्षवेधी उपस्थित केली. त्यानंतर महात्मे यांनी माध्यमांशी संवाद साधला.