धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तोडफोड

157

पुणे, दि. २४ (पीसीबी) – धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आज (शुक्रवार) दुपारी दोन तरुणांनी तोडफोड केली. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करणारे पत्रके भिरकावत आणि भंडारा उधळून त्यांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय असून या कार्यालयात दुपारी दोन तरुण पोहोचले. आरक्षणासंदर्भतील निवेदन द्यायचे आहे, असे सांगत दोघेही कार्यालयात गेले. यानंतर त्यांनी कार्यालयातील खुर्ची, टेबल व काचा फोडल्या. आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत त्यांनी कार्यालयात भंडारा देखील उधळला. यानंतर दोघांनी तिथून पळ काढला. तोडफोडीचे वृत्त समजताच पोलीस तिथे पोहोचले असून तोडफोडीच्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध सुरु केला आहे.