धनंजय मुंडे गुन्हा दाखल होताच फरार होतील; आमदार सुरेश धसांचे भाकीत

118

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – यंदाचे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे. विधान सभेत विरोधी पक्षनेता नाही. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गुन्हा दाखल होताच फरार होतील. त्यामुळे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेताच नसे, असे टोला आमदार सुरेश धस यांनी लगावला  आहे.

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडे  अडचणीत आले आहेत.  यावरून आमदार धस यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर हायकोर्टाने हा निर्णय दिल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवणारे मुंडे  या प्रकरणावरुन अडचणीत आले आहेत. त्यामुळे   मुंडे यांची सत्ताधारी पक्षांकडून कोंडी  होण्याची शक्यता आहे. आता तर मुंडे फरार होणार आहेत, असे भाकीत करून धस यांनी  मुंडेंवर निशाणा साधला आहे.