धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली

1

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : गायिका रेणू शर्मा यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, ओशिवरा पोलिसांनी आपली लेखी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोपही रेणू शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांनी मुंडेंवर केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ओशिवरा पोलिसांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर रेणू शर्मा यांनी पोलीस आयुक्तांच्या नावे एक पत्रं लिहिलं असून त्याची प्रत राज्यपालांनाही पाठवली आहे. या पत्रात त्यांनी मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून माझी फसवणूक केली. माझ्यावर बलात्कार करून माझं शारीरिक शोषण केलं. त्यामुळे मला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा आहे, असं शर्मा यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

WhatsAppShare