धनंजय मुंडेंच्या आरोपावर पंकजा मुंडे म्हणतात …

386

बीड, दि. २० (पीसीबी) – मला राजकारणातून काही कमवायचे नाही, पण ज्या पद्धतीने  माझ्यावर खालच्या पातळीवरून आरोप केले जात आहेत, ते पाहून मन व्यथित झाले, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या महिलांशी  संवाद साधताना दिली.

पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका  केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार  धनंजय मुंडे यांच्या विरोधात  शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. यावर पंकजा यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजपने महिला आयोग आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी विडा येथे झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलतांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका केली होती, टिकेचा व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे विरोधात पंकजा मुंडे समर्थक, वंजारी समाज आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. भाजपा महायुतीच्या परळी येथे झालेल्या समारोपाच्या सभेत या विषयावर आक्रमक पवित्रा घेत पंकजा  मुंडे यांनी धनंजय मुंडेवर कडाडून हल्ला चढवला होता. भाषणानंतर त्यांना भोवळ आल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला.

WhatsAppShare