धक्कादायक: ६७ वर्षीय वृध्दाने केला आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

93

अकोला, दि. ११ (पीसीबी) – ६७ वर्षीय वृद्ध नराधमाने एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास अंदुरा गावात घडली.
याप्रकरणी उरळ पोलिसांनी निरंजन धोंडूजी उमाळे (वय ६७, रा. अंदुरा, अकोला) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास शौचास गेल्याचे पाहून मुलीच्या दारातच गप्पा मारत बसलेल्या निरंजन उमाळे या नराधमाने मुलीला जवळ घेतले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिचे तोंड दाबले व तिच्यावर अतिप्रसंग केला. काही वेळाने मुलीची आई घरी आली. मुलीने तिला आपबीती सांगितल्यानंतर मायलेकींनी पोलिस तक्रार दाखल केली. आईच्या तक्रारीवरून ठाणेदार सतीश पाटील यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध भांदवि ३७६, ३५४, पोस्को ४,८,१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी पोलिस आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत.