धक्कादायक: सुप्रीम कोर्टाच्या आवारात वकिलाने केला महिला पत्रकाराचा विनयभंग

93

दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – सुप्रीम कोर्टाच्या आवारात एका वकिलाने महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी वकिलास अटक केली आहे.

प्रणयकुमार असे या आरोपीचे नाव असून त्याने दोन वेळा महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत राहणारी महिला पत्रकार ऑगस्ट महिन्यात सुप्रीम कोर्टात एका प्रकरणाच्या सुनावणीचे वार्तांकन करण्यासाठी गेली होती. यादरम्यान प्रणय कुमारने तिचा विनयभंग केला. यापूर्वीही प्रणयकुमारने एकदा गर्दीचा फायदा घेत महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आधी पीडित महिला आणि अन्य साक्षीदारांचा दंडाधिकारी यांच्यासमोर जबाब नोंदवून घेतला. यानंतर प्रणयकुमारला अटक केली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आवारातच ही घटना घडल्याने देशाच्या सुप्रीम कोर्टातच महिला सुरक्षित नसतील तर रस्त्यावर महिला कशा सुरक्षित असतील, असा सवाल उपस्थित होत आहे.