धक्कादायक : सहा महिने बंधक बनवून जबरदस्तीने पॉर्न फिल्म दाखवत महिलेवर बलात्कार  

1884

भोपाळ, दि. १३ (पीसीबी) – भोपाळच्या एका खासगी वसतिगृह बलात्कार प्रकरणात आणखी एक महिला समोर आली असून तिने वसतिगृहाच्या संचालकावर सहा महिने बंधक बनवून जबरदस्तीने पॉर्न फिल्म दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. भोपाळ वसतिगृह बलात्कार प्रकरणात समोर आलेली ही चौथी महिला आहे.

मागच्या आठवडयात एका २० वर्षीय मूकबधिर मुलीने वसतिगृहाच्या संचालकाविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. वसतिगृहाचा संचालक अश्विनी शर्माला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्यावर बलात्कार, दहशत निर्माण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी शर्माने मला बंधक बनवून ठेवले होते. मला पॉर्न फिल्मस पाहण्यासाठी भाग पाडले जायचे. त्यानंतर माझ्यावर बलात्कार केला जायचा असे पीडित महिलेने इंदूर पोलिसांना सांगितले. जेव्हा मी मागण्या मान्य करण्यास नकार दिला तेव्हा मला अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आली असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. धार जिल्ह्यात राहणाऱ्या या २३ वर्षीय महिलेला अश्विनी शर्माने अवधपुरी येथील स्वतंत्र घरात ठेवले होते. तिच्यासोबत आणखी चार जणी तिथे होत्या, अशी माहिती पिडीत महिलेने पोलिसांना दिली.