धक्कादायक: शिक्षकाची अल्पवयीन विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी

1163

अमरावती, दि. ११ (पीसीबी) – शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील शोभालाल राठी विद्यालयात घडली.

सुरेश ठाकूर (वय ५०) असे पोलखोल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी भातकुली येथील शोभालाल राठी विद्यालयात शिक्षण घेते. आरोपी सुरेश ठाकूर सुध्दा त्याच शाळेत शिक्षण म्हणून काम करतो. मात्र त्याने विद्यार्थिनेसोबत अश्लील चाळे करुन तिला शरीरसुखाची मागणी केली. हा सर्व प्रकार शोभालाल राठी विद्यालयातच घडला. यावर घाबरलेल्या विद्यार्थीनीने घडलेला प्रकार घरी सांगितला आणि सुरेशची पोलखोल झाली. पीडितेच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र सुरेश ठाकूर पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.