धक्कादायक: मुले होत नसल्याच्या दुखातून प्रेमविवाह झालेल्या तरुणीची भोसरीत आत्महत्या

370

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – मुले होत नसल्याच्या दुखातून तसेच या कारणावरुन पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून प्रेमविवाह झालेल्या एका तरुणीने लग्नाचा पेहराव परिधान करुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. ७) भोसरी येथे घडली.
विद्या शैलेश पारधी (वय २४, रा. भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्याचा काही वर्षांपूर्वी शैलेश सोबत प्रेम विवाह झाला होता. त्यांचा सुखी संसार सुरु होता. मात्र हे सुख काही काळच टिकले. विद्याला बाळ होणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. हे समजल्या पासून पती शैलेश दारु पिऊन तिला मारहाण करायचा. त्यामुळे काही दिवस विद्या आपल्या मैत्रीनीकडे रहायला गेली होती. तर प्रेम विवाह झाल्याने तीचे आईवडिल देखील तिच्या पासून दुरावले होते. यामुळे पेचात सापडलेली विद्या शनिवारी पती शैलेशच्या घरी गेली. तिथे तीने लग्नातला शालू, सोन्याचे दागिने, हाताला मेहंदी व माथ्यावर बिंदी लावली आणि आत्महत्या केली.
दरम्यान आत्महत्येपूर्वी विद्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये तीने पती शैलेशला दुसरा विवाह कर असे सांगितले. तसेच तिला त्रास देऊन नको अशी विनंती केली.