धक्कादायक ! भोसरीमध्ये गरोदर महिलेने शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली

64

भोसरी, दि.१९ (पीसीबी) : ‘तुला जेवण बनवता येत नाही , भांडी धुता येत नाही , तुला तुझ्या आई बापांनी काही शिकवले का नाही, जा जावुन जिव दे’ असे बोल लगावत सासरच्या लोकांनी गरोदर विवाहितेला सतत शारीरिक व मानसिक छळ मांडला. शिवाय आरोपींनी गरोदर विवाहीतेच्या पोटात लाथा घातल्या. शेवटी हे सहन न झाल्याने तिने स्वतः सह आपल्या पोटातील बाळाची देखील जीवनयात्रा संपवली. माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना भोसरीतील भगवतवस्ती मध्ये शुक्रवारी घाली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पतीसह सासूसासरे यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती विशाल विठ्ठल घंदुरे(वय ३५), सासु शोभा विठ्ठल घंदुरे(वय ५५), सासरे विठ्ठल घंदुरे(वय६५), स्नेहल विठ्ठल घंदुरे(वय२९), दिर विजय विठ्ठल घंदुरे(वय ३१), सर्व रा. समाधान कॉलनी भगवतवस्ती भोसरी ) या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मयत मुलगी वय ३२ वर्षे, भोसरी हीचे लग्न झाल्या नंतर लगेचच दुस–या दिवसा पासुन तिचे राहते घरी तिला आरोपी पती विशाल विठ्ठल घंदुरे, सासू सासरे नणंद दीर यांनी मिळुन तिला कामावरून बोल लावत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच विवाहित मुलगी ही गरोदर असतांना सासुने व नंणदेने रागाने मुलीस हातास धरून जमिनीवर ढकलुन देवुन शिवीगाळ केली. मुलीच्या पतीने मुलीच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिला उपाशी पोटी ठेवुन लग्नात घातलेले दागीने तिला घालण्यास न देता तिचा मानसिक छळ करून मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. अशी माहिती तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

WhatsAppShare