धक्कादायक: भोसरीत तरुणाने केला वृध्द भिक्षेकरी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

677

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – भोसरीत एका २४ वर्षीय तरुणाने ६५ वर्षीय वृध्द भिक्षेकरी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.७) रात्री अकराच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथे घडली.

विजय बोगा (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पिडीत भिक्षेकरी वृध्द महिला या भोसरी एमआयडीसी येथे एका रस्त्याच्या कडेला झोपल्या होत्या. यावेळी आरोपी विजय बोगा याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावर महिलेने आरडाओरड केली. यामुळे आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड मारला आणि तेथून पळणार इतक्यात परिसरातील नागरिकांनी विजय याला पकडून बेदम चोप दिला आणि भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.