धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला भर चौकात जिवंत जाळले

42

नागपूर, दि.२६ (पीसीबी) : प्रेमीयुगुलात टोकाचा वाद होऊन प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूर हादरलं आहे.. ही भयंकर घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.. आगीत होरपळलेल्या प्रेयसीनं उपचारादरम्यान प्राण सोडले..

शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेद्रनगर) असं मृत महिलेचं नाव आहे. शबाना धंतोली आदित्य मोटर्स येथे कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा प्रियकरासोबत वाद झाला. बघता बघता त्यांच्यातील वाद टोकाला गेला. संतापलेल्या प्रियकराने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकले. त्यानंतर शबाना यांना पेटवून देत प्रियकर घटनास्थळावरून पसार झाला.

प्रियकर दुचाकीवर निघून गेल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी हे दृश्य बघून घटनास्थळी धाव घेतली. आग विझवून शबाना यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

WhatsAppShare