धक्कादायक: पुण्यात इंजिनीअर तरुणीला अडीच महिने घरात डांबून बलात्कार

262

पुणे, दि. ५ (पीसीबी) – लग्नास नकार दिल्याच्या रागातून पुण्यातील एका २७ वर्षीय इंजिनीअर तरुणीला अडीच महिने घरात डांबून ठेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर आरोपीने तरुणीवर बलात्कार करतानाचा व्हीडीओ देखील काढला आहे. ही घटना कोथरुड परिसरात घडली.