धक्कादायक: नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून तिन महिलांना जाळले; नऊ महिन्याच्या मुलीचा गुदमरुन मृत्यू

566

नाशिक, दि. ६ (पीसीबी) – नाशिकच्या पंचवटी येथे अनैतिक संबंधातून तिघीजणींना जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (सोमवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.  या घटनेत  एका नऊ महिन्याच्या मुलीचा गुदमरुन मृत्यू झाला असून तिन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नाशिकच्या पंचवटीमध्ये राहणाऱ्या एका परप्रांतियाचे देव्हरे नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. ही महिला पंचवटी येथे दोन दिवसापूर्वीच रहायला आली होती. तिची मुलगी आपल्या नऊ महिन्याच्या मुलीसह तिला भेटायला आली होती. आज पहाटे या महिलेचे आणि तिच्या प्रियकराचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी घरात सदर महिला, तिची आई आणि मुलगीही होते. भांडण वाढल्यानंतर आरोपीने या तिघींच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले आणि तिथून पळ काढला. या तिन्ही महिलांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेत आग विझवली. यावेळी घरामध्ये प्रचंड धूर झाला होता. त्यामुळे घरातील नऊ महिन्याच्या मुलीचा गुदमरून मृत्यू झाला. तिघा महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीमुळे घरातील अख्खे सामान जळून खाक झाले आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.