धक्कादायक; नारळ फोडल्या प्रमाणे डोक्यात फोडल्या दारूच्या बाटल्या

291

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. एका देशी दारूच्या दुकानात जाऊन संबंधित व्यक्तीला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी २२ हजार रुपयांचा ऐवज लुटला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात आरोपींनी काउंटरवर असलेल्या प्रदीप खिरडे यांच्या डोक्यात तब्बल आठ देशी दारूच्या बाटल्या फोडत कोयत्याने वार केले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेप्रकरणी आरोपीला पकडण्यात आले असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोन च्या सुमारास प्रदीप खिरडे हे देशी दारूच्या दुकानात काउंटर सांभाळत होते. तेव्हा,  दारूच्या नशेत असलेल्या तीघांपैकी एकाने आत येताच दगडाने टीव्ही फोडला. दोघांनी काउंटर वरील प्रदीप यांना लक्ष केलं, अगोदर हाताने कॉलर पकडून बाहेर खेचण्याचा प्रयत्न झाला परंतु, प्रदीप हे त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात एकाने त्यांच्या कानशिलात लगावत दुसरा थेट काउंटरवर चढला आणि कोयत्याचा धाक दाखवत एक-एक अशी करून प्रदीप यांच्या डोक्यात ७ ते ८ देशी दारुच्या बाटल्या फोडल्या. तसेच कोयत्याने वार केले. घटना सीसीटीव्हीत कैद होऊ नये म्हणून सीसीटीव्ही फोडण्यात सीसीटीव्ही आला. ह्या सर्व घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी आरोपीं जेरबंद केले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.