धक्कादायक: देहुरोडमध्ये एका तीन वर्षीय चिमुर्डीवर बलात्कार

35

देहूरोड येथे एका तीन वर्षीय चिमुर्डीवर १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.६) ला घडली.

पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी शनिवारी (दि.७) याप्रकरणी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुला विरुध्द देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथे राहणारी एका तीन वर्षांची मुलगी शुक्रवारी तिच्या घरासमोर खेळत होती. यादरम्यान तिच्या घरा शेजारीच राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलाने तिला खेळण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी नेले. त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. नराधमाच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी रडत होती. मुलीच्या रडण्याच्या आवाज ऐकून तिच्या आईने मुलाच्या घराकडे धाव घेतली. मुलीच्या आईला बघताच नराधम मुलाने घटनास्थळावरुन पळ काढला. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शनिवारी या प्रकरणी देहूरोड पोलीसांकडे तक्रार दाखल केली. पोलीसांनी नराधम मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात बलात्कार आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.