धक्कादायक: दिल्लीत उपासमारीमुळे तीन चिमुरड्यांचा मृत्यू

145

दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – दिल्लीत उपासमारीमुळे तीन चिमुरड्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास घडली.

मृत पावलेल्या मुली दोन, चार आणि आठ वर्षाच्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी तिन्ही बहिणींचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी काहीच खाल्ले नव्हते. पाच जणांचे हे कुटुंब मूळचे बंगलाचे आहे. मुलींच्या वडिलांच्या मित्रासोबत ते दिल्लीला आले होते. मुलींचा मृत्यू झाल्यापासून वडिल बेपत्ता आहेत. रिक्षा चोरीला गेल्यापासून तो कामाच्या शोधात होता. काम शोधण्यासाठी घऱाबाहेर पडलेला तो अद्याप परतलाच नाही असे शेजाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान मुलींच्या आईची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे दिसत आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. कुटुंब राहत असलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमला काही औषधे सापडली असून, ती तपासली जात आहेत.