धक्कादायक: दिल्लीतील कोर्टाच्या चेंबरमध्ये वरिष्ठ वकिलाने केला महिला विकालावर बलात्कार

55

दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – दिल्लीतील साकेत कोर्टातील एका ३२ वर्षीय महिला वकिलाने आपल्या वरिष्ठावर बलात्काराचा आरोप केला आहे. शनिवारी रात्री एका खटल्यावर चर्चा करण्याच्या बहाण्याने वरिष्ठ वकिलाने मला त्याच्या कोर्टातील चेंबरमध्ये बोलवले व माझ्यावर बलात्कार केला असा आरोप महिला वकिलाने केला आहे.

पोलिसांनी एफआयआर दाखल करुन आरोपी ५० वर्षीय वकिलाला अटक केली आहे तसेच पीडित महिलेची जबानी नोंदवून महिलेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.

पिडीतेने दिलेल्या जबानीनुसार, मी माझ्या चेंबरमध्ये काम करत असताना साकेत कोर्टातील वरिष्ठ वकिलाने मला एका प्रकरणावर चर्चा करायची असल्याचे सांगून त्याच्या चेंबरमध्ये बोलावले. मी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा आरोपी मद्याच्या अंमलाखाली होता. त्याने केसवर चर्चा करण्याऐवजी मला ड्रींक ऑफर केली. मी नकार दिल्यानंतर आरोपीने अश्लील बोलण्यास सुरुवात केली व माझ्यावर लैंगिक जबरदस्ती केली. दक्षिण दिल्लीतील संगम विहार येथून पोलिसांनी आरोपीला वकिलाला अटक केली आहे. सध्या पोलीस चेंबरमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.