धक्कादायक: दारू पिऊ नको असे बोलल्याने  पतीने कापली पत्नीची जीब

651

कानपूर, दि. १९ (पीसीबी) – पत्नीने पतीला दारू पिऊ नको असा दम देऊन बडबड  केली म्हणून संतापलेल्या पतीने कात्रीच्या सहाय्याने थेट पत्नीची जीभ कापली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कर्नलगंज परिसरात  शुक्रवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास घडली.

संबंधीत महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी पती शकील अहमद (वय ४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला अंमलीपदार्थ आणि दारुचे व्यसन होते.  त्यामुळे पती-पत्नीमध्ये खटके उडत असायचे. शुक्रवारी रात्रीही दोघांमध्ये दारुच्या व्यसनावरुन भांडण झाले, यामुळे पत्नीने शकीलला दारु पिऊ नको असा दम देऊन बडबड केली. यावर संतापलेल्या शकीलने कात्रीच्या सहाय्याने थेट पत्नीची जीभच कापली. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी पती शकील विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर शकील फरार झाला आहे. कर्नलगंज पोलिस त्याचा शोध घेत आहेत.