धक्कादायक: दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आई-वडीलांनीच केला त्याचा खून

104

कोल्हापूर, दि. १५ (पीसीबी) – हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आई-वडीलांनीच त्याला विष पाजून खून केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

अनिकेत वाळवेकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी आई आणि वडील दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत याला दारुचे वेसन होते. तो दारु पिण्यासाठी सत्त घरात पैशांसाठी आई-वडीलांसोबत भांडण करायचा. या त्रासाला कंटाळून आई-वडील मानलेला मामा आणि दोघे असे ५ जणांनी त्याला विष पाजले. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत अनिकेतचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. हातकणंगले पोलीस अधिक तपास करत आहेत.