धक्कादायक: थेरगावात आयटी अभियंत्याने केला सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

801

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – थेरगाव पवारनगर येथील उच्चभ्रू सोसाटीमध्ये राहत असलेल्या एका आयटी अभियंत्याने त्याच इमारतीत राहत असलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१) रात्री नऊच्या सुमारास घडली.

चेतन कृष्णराव कामले (वय ३६, रा. पवारनगर, थेरगाव, मुळ.रा. नागपूर) असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत सहा वर्षीय चिमुकली आणि आरोपी चेतन हे पवारनगर येथील एकाच इमारतीत राहतात. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास चेतन याने सहा वर्षाच्या चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बोलवून घेतले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार पिडीत चिमुकलीने तिच्या आईला सांगितला. तेव्हा हा प्रकार समोर आला. पिडीतेच्या आईने तातडीने वाकड पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी चेतन याला अटक केली आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.