धक्कादायक: थेरगावात आयटी अभियंत्याने केला सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

76

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – थेरगाव पवारनगर येथील उच्चभ्रू सोसाटीमध्ये राहत असलेल्या एका आयटी अभियंत्याने त्याच इमारतीत राहत असलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१) रात्री नऊच्या सुमारास घडली.