धक्कादायक: गुप्तधनासाठी दोन वर्षांच्या चिमुकल्याचा नरबळी; आरोपी जेरबंद

446

नागपूर, दि. ३० (पीसीबी) – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील खंडाळा येथून बेपत्ता झालेल्या २ वर्षीय चमुकल्याचा गुप्तधनासाठी नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवार (दि.२९) उघडकीस आली.

युग अशोक मेश्राम (वय २ वर्ष) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सुनील श्रीराम बनकर व प्रमोद शामराव बनकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मयत युग हा बुधवार (दि.२२ ऑगस्ट) भाऊ हर्षल सोबत  घराबाहेर खेळण्यासाठी गेला होत मात्र बराच वेळ तो परतलातच नाही. यामुळे वडील अशोक केवलराम मेश्राम यांनी  ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली. तपासा दरम्यान सुनील श्रीराम बनकर व प्रमोद शामराव बनकर हे जादुटोण्याचा उपयोग करून गुप्तधनाच्या शोधात असतात, अशी माहिती पोलिसांच्या शोध पथकाला मिळाली. पोलिसांनी दोघांवर पाळत ठेवली असता सखोल चौकशीअंती बुधवारी (दि.२९ ऑगस्ट) प्रमोद बनकर याच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्याखाली युगचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.