धक्कादायक: कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न केल्याने दांपत्याला जबरदस्तीने करायला लावले मूत्रप्राशन

869

अलिराजपूर, दि. १ (पीसीबी) – कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न केल्याने मध्य प्रदेशातील अलिराजपूरमध्ये  दांपत्याला कपडे काढून बेदम मारहाण करत जबरदस्तीने मूत्रप्राशन करायला लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाइलमध्ये कैद झाला आहे.

याप्रकरणी २३ वर्षीय तरुण आणि २१ वर्षीय तरुणीने अलिराजपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पीडित दांमपत्य अलिराजपूरमधीलच रहिवासी आहेत. दोघांनी कुटुंबाच्या इच्छेविरोधात एकमेकांसोबत लग्न केले होते. लग्नानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी त्रास देऊ नये यासाठी तरुणाने त्यांना ७० हजार रोख रुपये आणि दोन बकऱ्या दिल्या होत्या. मात्र जात पंचायतीच्या आदेशानंतर दोघांवर हल्ला करण्यात आला. दोघेही गेल्याच आठवड्यात गुजरातहून अलिराजपूरला  परतले होते. तरुणाच्या काकांच्या घरी दोघे राहत होते. तरुणीच्या कुटुंबियांना याबद्दल कळताच त्यांनी दोघांचे अपहरण केले. तसेच दोघांचेही कपडे काढून  बेदम मारहाण करत जबरदस्तीने मूत्रप्राशन करायला लावले. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. पोलीस अधिकारी विकास कापनीस तपास करत आहेत.