धक्कादायक : किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीचे नाक करकचून चावून केले जखमी

272

लखनौ, दि. १३ (पीसीबी) – दारुड्या पतीने  किरकोळ कारणावरुन पत्नीचे नाक करकचून चावल्याची घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये घडली. या घटनेमध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

पूजा असे जखमी विवाहीतेचे नाव आहे. तर पती अर्जुन याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगड्या घेऊन देण्याच्या बहाण्याने अर्जुन पूजाला गावाबाहेर  घेऊन गेला होता. यावेळी त्या दोघांमध्ये तीज या सणासाठी माहेरी जाण्यावरुन भांडण झाले. यामुळे नशेत असलेल्या अर्जुनने पूजाचे नाक करकचून चावले आणि तिला जखमी केले.  पूजाच्या नाकामधून रक्त येऊ लागल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी अर्जुला अटक केली आहे.