धक्कादायक: कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने सरण रचून; विष प्राशन करत केली आत्महत्या

199

बुलडाणा, दि. ३० (पीसीबी) – कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून, त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२९) रात्री उशीरा सिंदखेडराजा तालुक्यातील सावरखेड तेजन गावात घडली.

गजानन जायभाये (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन जायभाये यांची तीन एकर शेती आहे. मात्र सत्तच्या नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर महाराष्ट्र बॅंकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यात कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना आणखी कर्ज मिळू शकले नाही. या सगळ्याला कंटाळून गजानन जायभाये यांनी रविवारी रात्री उशीरा आपल्या शेतात सरण रचले. त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. सिंदखेडराजा पोलिस तपास करत आहेत.