धक्कादायक: आळंदीत अल्पवयीन मुलासोबत महाराजाने केले अनैसर्गिक कृत्य

354

आळंदी, दि. ११ (पीसीबी) – वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर तेथील शिक्षक महाराजानेच अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात लहू अर्जुन गायकवाड (रा. सिद्धेबेट, मूळ गाव जांगलादेवी, घनसांगवी, जि. जालना) या संस्थाचालक, शिक्षक महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पीडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा आळंदीतील सिद्धबेट परिसरातील श्रीसंत ज्ञानराज माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या खाजगी संस्थेतील महाराज लहू गायकवाड यांच्याकडे शिक्षण घेत आहे. महाराजाने या मुलावर दि.१, ३ व ७ रोजी बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन अनैसर्गिक कृत्य केले. ही घटना मुलाने त्याच्या मित्रांना सांगितली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी देखील हा प्रकार स्वत: पाहिला.

तरुणाने घडलेला प्रकार भोसरीतील आपल्या मावशीला देखील सांगितला. तेव्हा हा प्रकार समोर आला. पोलिसांनी लहू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही देखील लहू महाराजाचे गैरप्रकार समोर आले आहेत.