धक्कादायक: आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ दहशतवादी संघटनेत शामील

43

श्रीनगर, दि. ९ (पीसीबी) – भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) एका अधिकाऱ्याचा लहान भाऊ हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिज्बुलने रविवारी (दि.८) एक फोटो प्रसिद्ध केला होता, यात आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे म्हटले होते.

हिज्बुलने प्रसिद्ध केलेल्या फोटोत शमसुल हक मेंगनू हा एके-४७ रायफल हातात धरून उभा आहे. हिज्बुलने त्याचे नाव ‘बुरहान सानी’असे ठेवले आहे. तो काश्मीर विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेत होता. मात्र २२ मे पासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा भाऊ इनामुल हक २०१२ च्या बॅचचा आयपीएस अधिकारी आहे.