धक्कादायक: आईच्या चितेजवळच मुलाने पेटवून घेत केली आत्महत्या

1506

लातूर, दि. १४ (पीसीबी) – जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात रविवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास आईच्या चितेजवळच मुलाने कारवर डिझेल टाकून कारसह स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

गजानन कोडलवाडे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गजानन कोडलवाडे हा खासगी वाहन चालक होता. त्याची दोन लग्न झाली होती. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलह वाढला होता. त्यातच तीन दिवसांपूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झाला. रविवारी रात्री अचानक गजानन हा अहमदपूर तालुक्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर ताजबंद शिवारात गेला. येथील स्मशानभूमीत त्याच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आईच्या चितेशेजारीच त्याने आपल्याबरोबर आणलेल्या स्कॉर्पियोवर डिझेल टाकले आणि स्वत:ला गाडीत कोंडून पेटवून घेतले. यात गजाननचा होरपळून मृत्यू झाला. गजानने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. अहमदपूर पोलीस तपास करत आहेत.