धक्कादायक: आंध्र प्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपी अल्पवयीन

72

ओंगोले, दि. २४ (पीसीबी) – आंध्र प्रदेशात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सलग पाच दिवस सहा जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील ओंगोले शहरात घडली.

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

प्रकाशम जिल्ह्याचे पोलीस अधिधक्ष सिद्धार्थ कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘१७ जून रोजी पीडित तरुणी ओंगोले येथे आरटीसी बस स्थानकावर उभी असता आरोपींपैकी एका तरुणाने मुलीशी मैत्री केली. यानंतर तो तिला आपल्यासोबत रुमवर घेऊन गेला जिथे त्याने आणि त्याच्या पाच मित्रांनी सलग पाच दिवस तरुणीवर बलात्कार केला’.

यानंतर पीडित तरुणीने आपली सुटका करुन घेतली आणि शनिवारी रात्री बस स्थानक गाठले. तिथे कर्तव्यावर असणारे होमगार्ड वेंकेटेश्वरलू आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू राव यांनी तिला पाहिले आणि सुटका केली असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. यानंतर तरुणीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे.