द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव शाळेमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा.

277

पिंपरी, दि.६ (पीसीबी) – आज दिनांक डिसेंबर २०१९ रोजी द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.  

कार्यक्रमांमध्ये भव्य स्वरूपाचे पूजास्थान सजविण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा व त्या भोवती फुलांची सजावट करण्यात आली संस्थेचे उपाध्यक्ष आयु. विकास भाऊ साळवे तसेच सचिव आयु.मनीषा साळवे मॅडम, ऑफिस सुपरिटेंडेंट आयु. अजित गायकवाड सर शाळेचे प्राचार्य भारत साळवे सर यांच्या हस्ते मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या व कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशीलाने  झाली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयु. श्रुती भिवरे मॅडम यांनी केले तदनंतर मुलांनी बाबासाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यामध्ये भक्ती गायकवाड, अनुजा सीरसाटश्रुष्टि माने, प्रज्ञा वाघमारे आदींनी बाबासाहेबांनी प्रति शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण केली यानंतर  प्राचार्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अरे सागरा शांत हो जरा या गीताने भाषणाचा शेवट केला ,भाषणानंतर संस्थेचे उपाध्यक्ष आयु. विकास भाऊ साळवे यांनी ओम मणी  पदमे हुं | या मंत्राचे पठण केले  यादरम्यान सर्व पालकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली यामध्ये पि.टी.ए  अध्यक्ष रूपालीताई सोनवणे ,उपाध्यक्ष लताताई भगत आयु. विशाल खूने सर, आयु अनिल कांबळे सर, दिनेश गायकवाड सर, आयु ज्योती खरात, उज्वला शिंदे, आयु माधव शिंदे, ज्ञानेश्वर सुरवसे इत्यादी समवेत सर्व पालकांनी आपले श्रद्धा बाबासाहेबां प्रति व्यक्त केली यानंतर धम्मपालन गाथा  घेऊन  कार्यक्रमाचा समारोप झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम मिस यांनी केले यामध्ये मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते

WhatsAppShare