दौंड रेल्वेस्थानकाजवळ अज्ञाताने एक महिन्याच्या बाळाला धावत्या रेल्वेतून फेकले

153

दौंड, दि. ६ (पीसीबी) – दौंड रेल्वेस्थानकाच्या परिसरात एका अज्ञात इसमाने नायलॉनच्या पिशवीत गुंढाळून एक महिन्याच्या बालकाला धावत्या रेल्वेतून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेस्थानकावरील आरपीएफच्या जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने बाळाला उपचारासाठी दौड येथील रेल्वे हॉस्पीटलमध्ये दाखल केले.

दौंड आरपीएफ जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड रेल्वे स्थानकाच्या आऊटर सिग्नलवर आरपीएफ कर्मचाऱ्याना एक नायलॉन पिशवी आढळून आली. या पिशवीतून संशयास्पद हालचाल दिसून आल्याने त्यांनी ती पिशवी ताब्यात घेतली असता त्यांना एक महिन्याचे बाळ आढळून आले. कुणीतरी अज्ञात इसमाने ही पिशवी धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याचा संशय आरपीएफने व्यक्त केला आहे. बाळाला दौंड येतील रेल्वे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून घटनेची नोंद दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.