दौंड तालुक्यातील पारगावमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

1140

पुणे, दि. १३ (पीसीबी) – दौंड तालुक्यातील पारगाव गावच्या हद्दीत भीमा नदी पात्राजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि.१२) रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तींनी तिचा गळा आवळून खून केला त्यानंतर तिचा मृतदेह एका सुती पोत्यात भरुण भीमा नदी पात्राजवळ टाकून दिल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनोळखी महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असून अंगावर पोपटी रंगाचा टॉप आहे. तिच्या दोन्ही हातात पिवळसर रंगाच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या घातलेल्या असून पायात जोडवी आहेत. या अनोळखी महिलेची ओळख अद्याप पटली नसून या महिलेबाबत कोणास अधिक माहिती असल्यास यवत पोलीस ठाणे क्रमांक (०२११९ – २७४२३३) वर संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. यवत पोलिस अधिक तपास करत आहेत.