दौंडमध्ये सराईताचा आखाडाच्या पार्टीदरम्यान धारदार शस्त्राने वार करुन खून

1101

दौंड, दि. ६ (पीसीबी) – आखाडाच्या पार्टीदरम्यानच एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील देलवाडी एकेरीवाडी येथे रविवारी (दि. ५) रात्री अकराच्या सुमारास घडली.

स्वप्नील ज्ञानदेव शेलार (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी यवत पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास स्वप्नील शेलार याने त्याच्या काही मित्रांसाठी घरी आखाडाची पार्टी ठेवली होती. यावेळी मटनाचा ढबा बाहेर घेऊन ये असे सांगून काही अज्ञात आरोपींनी स्वप्नील याला घरा बाहेरील एका रस्त्यावर बोलावले. तेथे काही अज्ञात आरोपींनी स्वप्नीलवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा निघृर्ण खून केला आणि पसार झाले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली असता तेथे त्यांना एक पिस्तूल आढळले त्यांनी ते ताब्यात घेतले आहे. मयत स्वप्नील हा सराईत गुन्हेगार आहे. यवत पोलिस तपास करत आहेत.