दोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती- विनोद तावडे

76

नागपूर, दि. १० (पीसीबी) – येत्या दोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. शिक्षण आणि क्रिडा विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना ते बोलत होते.

दोन महिन्यांत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून १८ हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत असल्याने भरतीत पारदर्शकता येणार आहे. यामुळे शिक्षण संस्थांना गुणवत्ता यादीनुसार भरती करावी लागणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

राज्यातील अर्धवट क्रिडा संकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. ३० खेळाडूंना थेट शासनात नियुक्ती देण्यात आली असून, ११ हजार ४६० खेळाडूंची प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण झाल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. पुढील ऑलिम्पिकसाठी ५५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर एक कोटी ७२ लाख खर्च करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.