दोन गटात हाणामारी; सात जणांवर गुन्हा दाखल

346

आळंदी, दि. १६ (पीसीबी) – आळंदी येथे दोन गटात हाणामारी झाली. याबाबत पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघेजण जखमी झाल्याने त्यांच्यावर आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ही घटना शनिवारी (दि. 14) दुपारी साडेचार वाजता आळंदी-वडगाव रोडवर घडली. सिद्धेश गोवेकर (वय 28, रा. च-होली बुद्रुक), ओंकार गाडेकर, अर्जुन वाघमोडे, सचिन दळवी, ओंकार भोसले, राहुल अभिमान चौरे (वय 30, रा. वडगाव रोड आळंदी) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव सानप यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपसात कोयता, लोखंडी पाईप, काठ्या घेऊन एकमेकांशी झोंबाझोंबी करून मारहाण करत होते. याबाबत आळंदी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून पाचजण पळून गेले. तर राहुल चौरे आणि एक अल्पवयीन मुलगा जखमी झाल्याने घटनास्थळी पडले होते. पोलिसांनी दोघांना आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.