दोन कंटेनरची समोरासमोर धडक एकाचा मृत्यू

27

तळेगाव दाभाडे, दि. २२ (पीसीबी) – तळेगाव-चाकण रोडवर माळवाडी गावाजवळ दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये एका कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दि. 21 पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली.

सुरज रामा खोत वय 21, रा. इंदोरी, ता. मावळ. मूळ रा. वंजारवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर असे म्रुत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याबाबत आप्पासाहेब मोहन ढोले वय 32 यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर एम एच 48 ए आय 6608 वरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कंटेनर चालक तळेगाव कडून चाकण बाजूकडे कंटेनर घेऊन जात होता. त्याचवेळी मयत सुरज इंप्रीटस इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक लिमिटेड खालुम्ब्रे यांच्या मालकीच्या कंटेनर (एन एल 01 / ए एल 2542) चाकण कडून तळेगाव कडे जात होता. माळवाडी गावच्या हद्दीत आरोपी कंटेनर चालकाने सुरजच्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात कंटेनर चालक सुरजचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही कंटेनरचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे तळेगाव-चाकण रोडवरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare